आरोग्य विज्ञान विद्यापीठाची अधिसभा खेळीमेळीत संपन्न
हरिभाऊ लाखे
नाशिक: -महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची सन २०२६ मधील प्रथम अधिसभा बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या बैठकीस विद्यापीठाचे कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा.डॉ. संजीव सोनवणे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधिकिरण सोनकांबळे व अधिसभा सदस्य बैठकीस उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. सचिन मुंबरे यांनी अधिसभेत अर्थसंकल्प सादर केला, सन २०२५-२६ चा लेखा व लेखा परिक्षण अहवाल डॉ. संतोष गटणे यांनी सादर केला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी या सभेचे संचलन केले.
याप्रंसगी कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा.डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले की, विद्यापीठाचा अर्थसंकल्प उद्दिष्टपुर्तीकडे वाटचाल करणारा आहे. या अर्थसंकल्पात संशोधनाला प्राधान्य देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधनाला वाव मिळावा याकरीता मोठया प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना तसेच स्पर्धात्मक व गुणवत्ता वाढीस चालना देण्यासाठी विद्यापीठातर्फे विविध उपक्रम राबविण्यात यावे यासाठी तरतूद आहे. संलग्नित सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक यांच्याकरीता विशेष तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता विविध कल्याणकारी योजना कार्यान्वीत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या सन २०२६ – २०२७ अर्थसंकल्पानुसार विद्यापीठाचे एकत्रित उत्पन्न रु. ६१३.३७ कोटी इतके अपेक्षित असून उत्पन्नाच्या तुलनेत एकत्रित खर्च रुपये ६१४.४७ कोटी इतका अपेक्षित असल्याने वित्तीय तूट रुपये ११० लक्ष इतकी अपेक्षित आहे.
विद्यापीठाचा सन २०२६ – २०२७ चा अर्थसंकल्प परिरक्षण, विकास आणि स्वतंत्र प्रकल्प व योजना या तीन प्रकारात विभागला आहे. विद्यापीठाचा अर्थसंकल्प विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यापीठातर्फे विविध विद्यार्थी कल्याणकारी योजना तयार करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी सुरु करण्यात आलेल्या योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. याकरीता १९.६९ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकरीता धन्वंतरी विद्याधन योजना, बहीःशाल शिक्षण, मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, कमवा व शिका योजना, संजिवनी विद्यार्थी सुरक्षा योजना, राणी लक्ष्मीबाई निर्भया अभियान अभियान योजना, महात्मा ज्योतीराव फुले शिष्यवृत्ती योजना आदी योजनांचा समावेश आहे. मानसिक ततणावामूळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या करतात. अभ्यास कसा करावा याबाबत शिक्षकांनी प्रभावीपणे तंत्रज्ञानाचा वापर करुन शिक्षण देण्यासाठी तसेच शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील अंतर कमी करणे व समुपदेशन व्हावे यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास व समुपदेशन शीर्षातंर्गत अर्थसंकल्पात रु. ६० लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.
विद्यापीठाला संलग्नित सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक यांना संशोधनास प्रेरणा मिळावी त्यासाठी त्यांना महाविद्यालय स्थरावर अत्याधुनिक संशोधन पुस्तके उपलब्ध व्हावीत अद्ययावत ज्ञान त्यांना मिळावे हा विद्यापीठाचा उदे्दश आहे यासाठी अर्थसंकल्पात रु. १५० लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाÚयांचे ज्ञान अद्ययावत रहावे यासाठी विद्यापीठामार्फत वेळोवेळी प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. यासाठी प्रशिक्षण व कार्यशाळांच्या आयोजनासाठी अर्थसंकल्पात ३५ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
विद्यापीठात कार्यरत दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी विविध योजना कार्यान्वीत आहेत त्यांचा लाभ घेता यावा यासाठी स्किम फॉर पर्सन विथ डिझॅबिलिटी हे लेखाशिर्ष घेण्यात आलेले त्याअंतर्गत रु. ६० लक्ष इतकी तरतुद करण्यात आलेली आहे. नागपूर, कोल्हापूर येथे जागा खरेदी करुन विद्यापीठाचे स्वतःच्या जागेत बांधकाम करुन विभागीय केंद्र कार्यान्वीत करण्यासाठी अर्थसंकल्पात ११०० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठाचे मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर व लातूर येथील विभागीय केंद्रे सक्षम करण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांव्दारे आरोग्य व शिक्षण विषयक समाजात जनजागृती करण्यासठी अर्थसंकल्पात २० लक्ष इतकी तरतूद आहे. विद्यापीठात कार्यन्वीत आरोग्य केंद्राकरीता ६३ लक्ष रुपये, कर्मचारी कण्याणकारी योजनांकरीता १२१ लक्ष रुपये व ‘इक्षणा’ म्युझियम ही नाशिकच्या वैभवात भर घालणार असून त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. संशोधन प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात २३.५८ लक्ष रुपयांची तरतूद केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय संशोधनाला केंद्रासाठी ३.५१ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. समर इंटर्नशिप प्रोग्रामकरीता १.२५ कोटी व एआय आधारित ब्लॉकचेन तंत्रज्ञानासाठी ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या अधिसभेत अधिसभा सदस्य डॉ. विठ्ठल धडके, डॉ. राजकुमार पाटील, डॉ. वाय. प्रवीणकुमार, डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. चेतना गोरीवाले, डॉ. संतोष गटणे, डॉ. शिरिष पांडे, डॉ. बाबासो माळी, डॉ. यशवंत पाटील, डॉ. अभिजित जगताप, डॉ. विनोद चौधरी, डॉ. संतोष गटणे, डॉ. सचिन उमरेकर, डॉ. प्रशांत बनसोड, डॉ. आनंद टेंभुर्णीकर, डॉ. फारुक मोतिवाला, डॉ. राजेश शहा, डॉ. जयमाला शिर्के, डॉ. चंद्रकांत डेरे, डॉ. लक्ष्मण गायकवाड, डॉ. प्रदीप भाबड, डॉ. रविंद्र देवकर, डॉ. प्रशांत जाधव, वैद्य प्रज्ञा कापसे, डॉ. भालचंद्र ठाकरे, डॉ. रविंद्र चांडक, डॉ. अजय दहाड, डॉ. मृणाल पाटील, श्रीमती ज्योती इटनकर, डॉ. पियुष निंबाळकर, श्री. उत्तरेश्वर दराडे, श्री. निखिल महाजन, श्री. बापुसाहेब झिने तसेच डॉ. विभाग हेगडे, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. मिनल मोहगांवकर, डॉ. गिरिष ठाकूर, डॉ. सतिष शिंदादकर, डॉ. वैष्णवी बावणे, डॉ. मनिषा सोलंखी, डॉ. महेंद्र गौशल, डॉ. राजेश्वर उबरहांडे, डॉ. अभय दातारकर, डॉ. विश्रांती गिरी, डॉ. अरुण दोडामणी, डॉ. निलिमा राजहंस, डॉ.मिनाक्षी सोलंखी, डॉ. विष्णु बावणे, डॉ. हेमलता जळगांवकर आदी मान्यवर व ऑनलाईन उपस्थित होते.
