डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा
भाजप नगरसेविका रंजना पेणकर यांची महापौर, उपमहापौर, आयुक्तांकडे मागणी
कल्याण: डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशन परिसरातील वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येमुळे नागरिकांना होत असलेला त्रास, वाहतुकीची अडचण तसेच सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन भाजप नगरसेविका रंजना पेणकर यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षली चोधरी, उपमहापौर राहुल दामले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
नागरिकांकडून प्राप्त झालेली निवेदने, स्थानिक रहिवाशांच्या मागण्या व सार्वजनिक हिताचा विचार करून हा परिसर फेरीवाला मुक्त करण्याची तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व निर्बाध पादचारी मार्ग उपलब्ध व्हावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा येणाऱ्या काळात नागरिकांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा नगरसेविका रंजना पेणकर आणि मितेश पेणकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *