शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्याच्या विरोधात शिक्षण क्रांती संघटनेचे आक्रमक पाऊल
कल्याण : महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्याच्या सरकारी निर्णयाविरोधात तीव्र आवाज उठवण्यात आला आहे. संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना पत्र लिहून शिक्षकांना बूथ लेव्हल ऑफिसर सारखी अशैक्षणिक कामे देण्याचा तीव्र विरोध केला आहे.
संघटनेचे म्हणणे आहे की, RTE Act २००९ च्या कलम २७ नुसार शिक्षकांना शैक्षणिक कामांव्यतिरिक्त अन्य कामे देणे बेकायदा आहे. यामुळे शिक्षकांचे ध्यान शिक्षणापासून विचलित होते व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. शिक्षकांना गैर-शैक्षणिक कामे करण्याची सक्ती प्रशासन करीत आहे व तसे न केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची धमकीही दिली जात असल्याचे संघटनेचे आरोप आहेत. संघटनेच्या पत्रात शासन निर्णय क्र. पीआरआई-२०१०/प्रक्र. २२५/प्राशि-१, १८ जून, २०१० चा संदर्भ दिला आहे, ज्यात दशवार्षिक जनगणना,सार्वजनिक निवडणुका यांसारख्या कामांसाठी शिक्षकांची नियुक्ती केली जात असते त्यावर कोणताही विरोध नाही . पण BLO सारख्या “अशैक्षणिक कामामुळे शिक्षकांना शाळेबाहेर राहावे लागत आहे.
संघटनेने पत्रातून जिलाधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे की, शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करावे व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान टाळावे. यासाठी संघटनेने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या सहयोगाची अपेक्षा व्यक्त केली आहे. या मुद्द्यावर सरकारचे काय उत्तर आहे हे जाणून घेण्यासाठी वृत्तांतर्गत तपास सुरू आहे. शिक्षकांच्या अधिकारांबाबत व शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी संघटनेच्या मागण्यांचा प्रभाव काय असेल, यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
००००००००
