अशोक गायकवाड
कर्जत : कर्जत तालुका आरपीआय अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कोंदीवडे येथे शाखा नाम फलकाचे उद्घाटन व नूतन शाखा कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.कर्जत तालुक्यात आर पी आय (आठवले) या पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी घौडदौड सुरू असून अनेक तरुण पक्षात येत आहेत. त्याच माध्यमातून रविवार, दि. १० मार्च रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले ) तालुका कर्जत यांच्या विद्यमाने रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कोंदीवडे येथे शाखा नाम फलकाचे उद्घाटन व नूतन शाखा कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. याप्रसंगी तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड तसेच कोकण प्रदेश युवा सरचिटणीस जिवक गायकवाड यांनी शाखेचे पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर झालेल्या बैठकीत कर्जत तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. बीआरएसपी पक्षांचे वेणगाव येथील नितिन सोनावणे यांचा आरपीआय पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला.यावेळी तालुका सरचिटणीस अनंता खंडागळे, कर्जत तालुका महिला अध्यक्षा अलका सोनवणे, तालुका उपाध्यक्ष किशोर गायकवाड, तालुका संपर्कप्रमुख जगदीश शिंदे, कर्जत तालुका उपाध्यक्ष अशोक गायकवाड, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – कोंदिवडे शाखेच्या पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *