निशांत मार्कंडेय दिल्लीमध्ये सन्मानित
कल्याण : निशांत मार्कंडेय यांना दिल्ली येथे हनी बी नेटवर्क आणि सृष्टि यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात गांधी अन यंग टेक्नोलॉजिकल इनोव्हेशन (जीवायटीआय) प्रशंसा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार निशांत यांना पॉलिमर कचऱ्याच्या डीपॉलिमरायझेशनसाठी शाश्वत प्रक्रियेच्या विकासासाठी देण्यात आला आहे. निशांत सध्या सीएसआयआर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथे पीएच.डी. करत आहेत.
हा पुरस्कार प्रमुख संस्थांतील प्रख्यात प्राध्यापक आणि वैज्ञानिक यांच्या बहुस्तरीय मूल्यमापनानंतर प्रदान केला जातो. जीवायटीआय पुरस्कार कार्यक्रमाचे मुख्य अतिथी भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद होते. कार्यक्रमाची अध्यक्षता सीएसआयआरचे माजी महासंचालक आणि रिलायन्स न्यू एनर्जी कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. आर. ए. माशेलकर यांनी केली.
