ऑपरेशन सिंधुरमध्ये पाकचे पंतप्रधान ठार झाले असते ?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पचा दावा
न्यूयॉर्क : मी नसतो, तर पाकिस्तान आणि भारत यांच्यात अणुयुद्ध झाले असते, जर मी हस्तक्षेप केला नसता तर ऑपरेशन सिंदुरदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान मारले गेले असते, असा खळबळजनक दावा ट्रम्प यांनी केला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर ७ मे रोजी भारताने दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ लाँच करून सुरू झालेला 4 दिवसांचा संघर्ष मी थांबवला. ट्रम्प यांनी हे दावे त्यांच्या दुसऱ्या टर्मच्या पहिल्या वर्षातील ‘स्टेट ऑफ द युनियन’ भाषणादरम्यान केले. तथापि, जेव्हा त्यांनी हे दावे केले, तेव्हा एका काँग्रेस महिला सदस्याने त्यांना “हे खोटं आहे” असे ओरडून सांगितले. भारताने नेहमीच या प्रकरणात कोणत्याही देशाने मध्यस्थी केलेली नाही, असे वारंवार सांगितलं आहे. या भाषणार ट्रम्प यांनी अनेक दावे केले.
ट्रम्प म्हणाले की इराण अमेरिकेपर्यंत पोहोचू शकणारी क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. ते म्हणाले की इराणने आधीच युरोप आणि आमच्या परदेशातील तळांना धोका निर्माण करणारी क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत आणि लवकरच अमेरिकेपर्यंत पोहोचतील अशा क्षेपणास्त्रांवर काम करत आहे. ट्रम्प म्हणतात की इराणने 32 हजार निदर्शकांना मारले आणि अमेरिकेला युद्धात ढकलू इच्छित आहे.
ट्रम्प म्हणाले की अमेरिकेने गेल्या वर्षी इराणच्या अण्वस्त्र सुविधांवर हल्ला करून इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे नष्ट केला. प्रथम राजनैतिक मार्गाने हा प्रश्न सोडवू इच्छितात, परंतु इराणने अण्वस्त्रे विकसित न करण्याचे आश्वासन दिले नाही. ते म्हणाले की आम्ही कधीही अण्वस्त्रे विकसित करणार नाही असे शब्द ऐकले नाहीत.
