कल्याणमध्ये रविवारी मोफत नेत्र तपासणी शिबीर
कल्याण: सोशल सर्व्हिस लीग, कल्याण धर्मादाय डोळ्यांचे व जनरल हॉस्पिटलच्या वतीने हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त रविवार,१ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन गुरु सिंग सभा गुरुद्वारा, रामबाग लेन नंबर ४, कल्याण पश्चिम याठिकाणी करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
