महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची शहापूरात स्थापना
ठाणे : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ११६०१ अर्थात ४३४० च्या शहापूर तालुका अध्यक्ष पदावर लक्ष्मण महाळुंगे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.तर उपाध्यक्षपदी माधुरी राठोड, सचिव पदावर संजय पोंढेकर,यांची निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्ष महेश बागराव व शशिकांत सपाट, खजिनदार पुनम भेरे,सहसचिव रविंद्र पवार, प्रसिद्धी प्रमुख निलेश विशे, संपर्क प्रमुख पद्माकर राठोड व विकास मेतकर, सल्लागार रमेश लोभी,चित्रा जगताप व अलका चव्हाण,संघटक सदानंद सोनारे, यांची निवड करण्यात आली.शहापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बी.एच.राठोड महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियनचे जिल्हा अध्यक्ष गजानन विशे तसेच सहायक.प्रशासन अधिकारी अजय भोंडिवले यांच्या अध्यक्षेतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली शहापूर पंचायत समितीच्या या नव्या कार्यकारणीची निवड ही सर्वानुमते करण्यात आली आहे.यावेळी मोठ्या संख्येने पंचायत समिती शहापूरचे कर्मचारी उपस्थित होते.कर्मचा-यांच्या वेतनत्रुटी तसेच पदोन्नती स्तर कमी करणेकरिता जिल्हा तसेच राज्य स्तरावर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या माध्यमातून पाठपुरावा करुन कर्मचाऱ्यांचे हे जिव्हाळयाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष लक्ष्मण महाळुंगे यांनी सांगितले कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन केले जात आहे.
