कल्याण डोंबिवलीत नोटरी करारावरील घरांचा कर नवीन मालकाच्या नावे करा
भाजप नगरसेवक दिपेश म्हात्रे यांची आयुक्तांकडे मागणी
कल्याण : कल्याण डोंबिवली नोटरी करारावर विक्री झालेल्या घरांचा मालमत्ता कर नवीन मालकाच्या नावे हस्तांतरित होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढत असल्याचा मुद्दा पुढे करत भाजप नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी केडीएमसी प्रशासनाकडे ठोस भूमिका घेण्याची मागणी केली आहे.
नोटरी करारावर अनेक घरे विकली गेल्यानंतरही त्या मालमत्तांचा कर जुन्या मालकाच्या नावावरच राहतो. परिणामी कर वसुलीत अडथळे निर्माण होत असून कोट्यवधी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम होत असल्याचे म्हात्रे यांनी नमूद केले. यासंदर्भात त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. नोटरी कराराच्या आधारे मालमत्ता विक्री झालेल्या प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीनंतर नवीन मालकाच्या नावे कर हस्तांतरण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *