क्रुरकर्मा हुकुमशहा अडॉल्फ हिटलरच्या छळछावण्यात नरसंहार केल्या गेलेल्या लाखो ज्यु समाजाच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या ‘याद वाशेम’ म्हणजेच जागतिक होलोकॉस्ट स्मृती केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी पुष्पचक्र अर्पण करीत सहवेदना व्यक्त केल्या. यावेळी इस्त्रालयचे पंतप्रधान नेतान्याहू मोदीं सोबत होते.
