महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ मराठी भाषा गौरवदिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतील मराठी वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहीनीच्या संपादकांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
