

मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट जिमनॅस्टिक असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध
मुंबई : वडाळा येथील मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयात मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट जिमनॅस्टिक असोसिएशनची
पंचवार्षिक निवडणूक २०२६ – २०३१ ची संपन्न झाली. ही निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत राजेश चारी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच महाराष्ट्र हौशी जिमनॅस्टिक संघटने चे खजिनदार आशिष सावंत हे या निवडणुकीसाठी निरीक्षक होते. नवीन कार्यकारणी ने आगामी पाच वर्षांत मुंबई शहरातील जिमनॅस्टिक खेळाच्या विकासासाठी विविध उपक्रम, स्पर्धा आयोजन व खेळाडूंना प्रशिक्षण व प्रोत्साहन देण्याचा संकल्प व्यक्त केला. उपस्थित सदस्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट जिमनॅस्टिक असोसिएशनची २०२६ – २०३१ ची नवी कार्यकारिणी –
अध्यक्ष : संजय शेटे, उपाध्यक्ष : वर्षा उपाध्ये, अजय मापुस्कर, तन्वी जिंदाल शेटे, सचिव : डॉ. राजेंद्र नाना शेळके, उपसचिव : देवेंद्र पाटील, सोनाली सावंत, प्रकाश जावळे, खजिनदार : डॉ. दादासाहेब शिंदे सभासद : राजेंद्र ढाकणे, अक्षता शेटे जाधव, फिरोज बेळगावकर, गणेश चाळके, सिद्धेश मांजरेकर, प्रेमानंद नाईक, रविंद्र विसपुते, आकाश डोंगरे, प्रशांत गायकवाड, संदीप चव्हाण
