प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोशी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात
राजीव चंदने
मुरबाड : तालुक्यातील चर्चेत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोशी येथे १६ तारखेला कार्यरत डॉ. उपस्थित नसल्याने रुग्णांची गैरसोय झाली आहे. शासनाने ग्रामीण भागातील गरीब आदिवासी रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली. परंतु सध्या हे चित्र वेगळे दिसत आहे. मुरबाड तालुक्यातील अनेक वाडी पाड्यातील जनतेसाठी अवलंबून असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोशी हे आशेचे किरण दिसत होते. परंतु सध्या हे चित्र उलट दिसत आहे. सामान्य लोकांच्या सेवेत रुजू झालेल्या आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले डॉ. त्यांच्या मनमानी कारभारामुळे चर्चेत आले आहे. आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही स्थानिक नागरिकांकडून अधिक माहिती घेतली असता भयानक चित्र आमच्या समोर आले आहे. आरोग्य केंद्रात शासनाकडून कार्यरत असलेले तीन डॉक्टर हे कर्तव्यात कसूर करतं असून मनमानी कारभार करत आहेत. आठवड्यातून एकच दिवस हजर राहणे, रात्रपाळीच्या वेळी बाहेर ठिकाणी जाणे, इतर पथकातील डॉक्टरांना आरोग्य केंद्रात सेवा देण्यासाठी बजावणे, रुग्णवाहिकेतील डॉ. यांना ओपीडी करायला सांगणे हे संतापजनक आहे. त्यामुळे रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ग्रामीण दिनेश जाधव यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन कळविले आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोशी येथे वैद्यकीय अधिकारी यांच्यात गरीब आदिवासी रुग्णांना सेवा देण्यासाठी कर्तव्यात कसूर होत आहे. तसेच दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजीचे सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषी असणाऱ्यांवर
तातडीने कारवाई करावी अन्यथा परिसरातील गरीब आदिवासी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे दै, बित्तंबातमी शी बोलताना दिनेश जाधव यांनी सांगितले.
