रंगकर्मी रविंद्र देवधर यांना बलराज साहनी पुरस्कार प्रदान

कल्याण: बलराज साहनी साहिर लुधियानवी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा बलराज साहनी पुरस्कार या वर्षी ज्येष्ठ रंगकर्मी रविंद्र देवधर यांना ३ मार्च रोजी एका विशेष कार्यक्रमात साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. वेगळा समाजप्रबोधनपर मार्ग निवडणारे अभिनेते व दिग्दर्शक म्हणून रविंद्र देवधर हे नाट्य वर्तुळात सुपरिचित आहेत.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अकथित पण महत्त्वपूर्ण पानं उलगडणाऱ्या, देवधर यांची संकल्पना व मुख्य भूमिका असलेल्या ‘मी भारतीय’ या दीर्घांकाचे २४९ प्रयोग त्यांनी केले आहेत. माजी एअर मार्शल भूषण गोखले, ऑस्करपर्यंत मजल मारलेले ज्येष्ठ कलाकार अरुण नलावडे यांसारख्या अनेक नामांकितांनी प्रत्येक भारतीयाने अनुभवायला हवा” असा नाट्यानुभव या शब्दांत ‘मी भारतीय’ला गौरवलेलं आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद – मध्यवर्ती शाखेचा ‘नाट्यकला मंदिर पुरस्कार’, अखिल भारतीय नाट्य परिषद – पुणे शाखेचा ‘भालबा केळकर पुरस्कार’, देवधर मंडळाचा ‘चतुरस्त्र व्यक्तिमत्व’ पुरस्कार यांशिवाय विविध प्रवाहबाह्य नाट्यकृतींसाठी पटकावलेली राज्य नाट्य स्पर्धेची अनेक पारितोषिकं देवधर यांच्या नावावर यापूर्वी जमा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *