शिवशंकर उत्सव मंडळाच्यावतीने राज्य कॅरम स्पर्धेचे आयोजन
मुंबई : शिवशंकर उत्सव मंडळाच्यावतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने श्रमिक जिमखाना, ना. म. जोशी मार्ग, मुंबई – ११ येथे दिनांक १३ ते १५ मार्च २०२६ दरम्यान राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या वतीने दुसऱ्यांदा कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली असून पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये स्पर्धा रंगणार आहेत. स्पर्धेतील पहिल्या आठ विजेत्यांना मिळून एक लाख दहा हजारांची रोख बक्षिसे व चषक देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. ६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, राजाराणी चौक जवळ, शिवाजी पार्क येथे मुंबईतील खेळाडूंची नावे क्लब मार्फत स्वीकारली जातील. तर इतर जिल्ह्यातील खेळाडूंनी नावे नोंदवण्यासाठी ५ मार्च २०२६ पर्यंत आपल्या जिल्हा कॅरम संघटनेशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधावा.
