महावितरणच्या कल्याण परिमंडळ कार्यालयामध्ये राष्ट्रीय लाईनमन दिवस साजरा
कल्याण : महावितरण कंपनीच्या कल्याण परिमंडळात राष्ट्रीय लाईनमन दिन साजरा करण्यात आला. परिमंडळ कार्यालयात उपस्थित लाईनमन (जनमित्र) यांना मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी संबोधित केले. जनमित्र हा महावितरण कंपनीचा ग्राहक आणि अधिकारी यांच्यातील संपर्क साधणारा दुवा आहे. एका अर्थाने आपण महावितरणच्या व्यवस्थेतील मुख्य कणा आहे. असे उदगार संबोधित करताना मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी जनमित्रांचे कौतुक केले.
या वेळी उपस्थित सर्व जनमित्रांना सुरक्षा उपकरणे वापरण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही रॅली संतोषी माता रोड, प्रेम ऑटो चौक, खडकपाडा सर्कल, साई चौक, वाणी विद्यालय, संदीप हाॅटेल, बिर्ला कॉलेज, पौर्णिमा चौक मार्गे परिमंडळ कार्यालयात परत आली. तसेच कल्याण मंडळ १ व कल्याण मंडळ २ चा लाईनमन दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी सुरक्षित कामाबाबत चित्रफीत दाखविण्यात आली व सुरक्षा शपथ घेण्यात आली.
जनमित्रांसाठी पी. अशोक यांनी हसरी मैफिल हा हास्य विनोदी कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी उपस्थित जनमित्रांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अधिक्षक अभियंता अनिल थोरात, महेश अनचिनमाने, सुशील पावसकर सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, उपस्थित होते.
या शिवाय कल्याण परिमंडळात अंतर्गत येणाऱ्या डोंबिवली, कल्याण पूर्व, बदलापूर, उल्हासनगर, नालासोपारा, वसई, विरार येथील कार्यालयात देखील राष्ट्रीय लाईनमन दिन साजरा करण्यात आला.
