दैनंदिन वापरातील शालेय गणित’ पुस्तक प्रकाशित

कल्याण : रा.फ.नाईक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय कोपरखरणे येथे ‘स्कूल मॅथेमॅटिक इन डेली लाईफ या पुस्तकाचे प्रकाशन श्रमिक शिक्षण मंडळ, संस्था अध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते मराठी आणि इंग्रजी  भाषेत करण्यात आले.

या प्रसंगी या ग्रंथाचे लेखक प्रा. राजेंद्र रोकडे यांचा सत्कार संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी नरेंद्र म्हात्रे, गुरुवर्य इ.ए. पाटील, मुंबई विद्यापीठाचे गणित विभाग प्रमुख भाऊसाहेब देसले, डॉ.नरेंद्रकुमार दसरे आणि सर्व विभागीय मुख्याध्यापक शिक्षक वृंद उपस्थित होता. संदीप नाईक यांनी या पुस्तकातील माहिती विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने उपयोगी येईल याबद्दल सांगितले व शिक्षण क्षेत्रातील प्रवासाबरोबर त्यांच्या विद्यार्थ्यांकडून आलेले प्रश्न आणि गणिताचा आजच्या शिक्षण प्रवाहात वापर या पुस्तकातून सुरेखपणे मांडल्यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.

मुंबई विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख भाऊसाहेब देसले यांनी शिक्षण क्षेत्रातील राजेंद्र रोकडे सरांच्या सेवेतील ३३ वर्षातील आलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि त्यासाठी त्यांनी केलेले वाचन लेखन आणि या विषयावर तयार केलेले पुस्तक याबद्दल मौलिक माहिती दिली.  डॉ.नरेंद्रकुमार दसरे यांनी या पुस्तकाचा दैनंदिन जीवनात विद्यार्थी कसे उपयोग करून घेतील याबद्दल सांगितले. ज्येष्ठ मार्गदर्शक इ.ए. पाटील यांनीही विविध, आध्यात्मिक आणि प्रासंगिक दाखले देऊन माहिती सांगितली. मुख्याध्यापक रवींद्र पाटील आभार प्रदर्शन यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी सर्व संस्था शिक्षक आणि प्राचार्य प्रताप महाडिक, मुख्याध्यापिका राजश्री यादव, मुख्याध्यापिका सुमती सुबैया, मुख्याध्यापिका सीमा म्हात्रे, मुख्याध्यापिका इलेन फर्नाडीझ, उपमुख्याध्यापिका चारुशीला चौधरी, पर्यवेक्षिका नसीम कुरणे हजर होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालनपल्लवी जाधव तर रांगोळी रेखाटन सुजाता म्हात्रे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *