जागतिक महिला दिनानिमित्त

वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये महिला पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

मिरा-भाईंदर

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड यांच्या वतीने महिला पत्रकारांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणाबरोबरच त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हे शिबिर ६ मार्च, सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत रुग्णालयाच्या १४ व्या मजल्यावरील ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये उंची, वजन, रक्तदाब (BP), रँडम ब्लड शुगर (RBS), फुफ्फुस तपासणी (PFT), डॉक्टर सल्ला, हाडांची तपासणी (BMD) तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ईसीजी अशा विविध तपासण्यांचा समावेश असणार आहे.

हे शिबिर विशेषतः महिला पत्रकारांसाठी तसेच त्यांच्या आईसाठी आयोजित करण्यात आले असून, पुरुष पत्रकारांच्या पत्नी किंवा आईसुद्धा या शिबिराचा लाभ घेऊ शकतात. मात्र, ही आरोग्य तपासणी फक्त महिलांसाठीच मर्यादित असल्याची नोंद आयोजकांनी स्पष्ट केली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी नियमित तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे. सदर शिबिरास महिला पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन वोक्हार्ट  हॉस्पिटल्स, मीरा रोड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *