३० कलाकारांची अभूतपूर्व भव्य ऐतिहासिक शास्त्रीय संगीत स्वरमैफल – ‘अर्घ्य २०२६’

पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांची मुख्य अतिथी म्हणून विशेष उपस्थिती

मुंबई: २२ मार्चला ‘अर्घ्य इंडियन क्लासिकल म्युझिक अँड फाईन आर्ट फाउंडेशन’तर्फे ‘अर्घ्य २०२६’ या अभूतपूर्व सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय शास्त्रीय संगीताची पहिली भव्य ऐतिहासिक ‘सिम्फनी’ अर्थात स्वरमैफल असे याचे स्वरूप आहे. वांद्रे येथील प्रतिष्ठित बालगंधर्व रंगमंदिर येथे संध्याकाळी ६:३० वाजल्यापासून हा सोहळा रंगणार असून, यात पाच वेगवेगळ्या घराण्यांचे प्रतिनिधित्व करणारे ३० कलाकार एकाच वेळी कलेचे सादरीकरण करतील.

ही अस्सल स्वरमैफल पवित्र गुरु शिष्य परंपरेला अधिक बळकटी देणारी ठरणार असून गुरु आणि शिष्य एकाच व्यासपीठावर एकत्र सादरीकरण करणार आहेत. त्यातून ज्ञानसंक्रमणाची आणि कलात्मक वारशाची अखंडित परंपरा अधोरेखित होणार आहे. शास्त्रीय संगीताचा अस्सलपणा टिकवून ती भव्य आणि खिळवून ठेवणाऱ्या स्वरूपात नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा फाउंडेशनचा हा एक अनोखा प्रयत्न आहे.

या ऐतिहासिक संध्याकाळी पाच दिग्गज कलाकार आणि त्यांचे शिष्य एकत्र कला सादर करनार आहेत. त्यांत, सतारचे जादूगार पंडित रवी चारी आणि त्यांचे शिष्य; प्रख्यात गायक पंडित राम देशपांडे आणि त्यांचे शिष्य; बासरीवादक पंडित रूपक कुलकर्णी आणि त्यांचे शिष्य; तबलामहर्षी पंडित योगेश साम्सी आणि त्यांचे शिष्य; तसेच पखवाजवादक श्री कृष्णा साळुंके आणि त्यांचे शिष्य यांचा समावेश आहे.

३० कलाकारांचा हा समूह शिस्त, परंपरा आणि कलात्मक सातत्याचा एक भव्य आत्मीय अनुभव प्रेक्षकांना देईल. या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला एक वेगळीच ऊंची आणि अध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे आज मैफलिंमध्ये फ्युजनचा वरचष्मा दिसत असताना ‘अर्घ्य २०२६’ ही एक दुर्मिळ आणि प्रेरणादायी पर्यायाची संकल्पना समोर मांडते. राग आणि ताल यांच्या शाश्वत समीकरणात पूर्णपणे रुजलेली एक ‘शुद्ध स्वरमैफल’ आहे. मोठ्या प्रमाणावर आणि सखोल रचनेत उभारलेला हा संगीतानुभव अनेक वाद्ये आणि आवाज यांना एक अखंड, सुरेल संवादात एकत्र आणण्यास सज्ज आहे. हा संवाद भारतीय शास्त्रीय परंपरेच्या शिस्त आणि सौंदर्यदृष्टीच्या मार्गदर्शनाखाली साकारला जाईल.

ही केवळ एक मैफल नसून, ती एक अगदी भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास म्हणून कल्पिलेली मैफल आहे. तो गाभ्याची अनुभूती, भक्तिभाव आणि ध्यानमग्न सौंदर्य यांचा साक्षात्कार घडवणारा एक सर्वांगिण उत्सव आहे. ‘अर्घ्य २०२६’ ही केवळ एक मैफल नसून भारताच्या समृद्ध संगीत वारशाचा ऐतिहासिक पुनरुच्चार आहे. ‘अर्घ्य फाउंडेशन’ सर्व रसिक आणि संगीतप्रेमींना या अभूतपूर्व स्वरमैफलीचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित करत आहे. ही मैफल शास्त्रीय संगीताच्या अखंड भव्य रूपाचे  दर्शन घडविण्यास सज्ज असून तिथे परंपरा, विद्वत्ता आणि भक्तिभाव यांचे एकत्रित दर्शन एकात्म, निनादमय संगीत यांच्या माध्यमातून घडणार आहे.

कार्यक्रम: ‘अर्घ्य २०२६’

३० कलाकार, ५ घराणी आणि १ भव्य भारतीय शास्त्रीय संगीत स्वर मैफल

प्रमुख कलाकार: पंडित रवी चारी, पंडित राम देशपांडे, पंडित रूपक कुलकर्णी, पंडित योगेश साम्सी, श्री कृष्णा साळुंके आणि या सर्व मान्यवरांचे शिष्य.

दिनांक आणि वार: रविवार, २२ मार्च २०२६

वेळ: संध्याकाळी ६:३० वाजल्यापासून

स्थळ: बालगंधर्व रंगमंदिर, लिंकिंग रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई.

तिकीट विक्री: www.bookmyshow.com वर उपलब्ध.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *