आंतर हॉस्पिटल गिरनार चषक क्रिकेट स्पर्धा

नानावटी,नायर हॉस्पिटलचे संघ विजेते

मुंबईत..आंतर हॉस्पिटल गिरनार चहा चषक  क्रिकेट स्पर्धेत एलिट गटात नानावटी हॉस्पिटलने तर प्लेट विभागात नायर हॉस्पिटलने विजेतेपदाचा मान‌ मिळवला.मुंबई क्रिकेट संघटनेची मान्यता असलेल्या या स्पर्धेत  मुंबई मधील  १६ नामांकित हॉस्पिटल  क्रिकेट  संघाचा समावेश  होता.गिरनार चहा ही स्पर्धा गेली ३० वर्षांपेक्षा जास्त काळ पुरुस्कृत करत आहे. शिवाजी पार्क जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्या मध्ये एलिट  विभागात  नानावटीने   कोकिलाबेनचा ६८  धावांनी सहज पराभव केला. नानावटीने पहिली फलंदाजी करताना २० षटकात २ बाद २०४ धावा केल्या होत्या. तर प्रतिस्पर्धी  कोकिलाबेनला  २०. षटकात ८ बाद १३६  धावांचीच मजल मारता आली.   प्लेट विभागात  नायरने  ब्रीच कँडीचा निर्णायक सामन्यात  पराभव केला. विजयासाठी नायर ला अवघ्या १४१ धावा करायच्या होत्या. स्पर्धेचा बक्षीस समारंभ  मुंबई क्रिकेट असोशिएशनचे  गव्हर्निंग कौन्सिल चेयरमन  राजदीप गुप्ता ,तसेच  मुंबई क्रिकेट असोशिएशन चे माजी  चिटणीस  अभय हडप  यांच्या हस्ते झाला.   स्पर्धा यशस्वी करण्यासाठी  एस. एच. जाफरी  ,अनिल बैकर  ,मिलींद सावंत यांनी आणि त्यांचा सहकाऱ्यांनी अथक  मेहनत घेतली.

फोटो ओळ. .प्लेट गटातील विजेता नायर हॉस्पिटलचा संघ राजदीप गुप्ता यांच्याकडुन चषक स्वीकारताना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *