नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर २, प्लॉट नंबर १२ येथील विद्या भवन सोसायटीमध्ये एका घरगूती क्लासवर बिल्डींगचा स्लॅब कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

गुरुवारी सायंकाळी सुमारे पाच वाजून वीस मिनिटांच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. तळमजल्यावर घरगुती क्लास सुरू असताना पहिल्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळला.

घटनेची माहिती मिळताच वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने तत्काळ बचावकार्य हाती घेत मलब्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले.

अग्निशमन विभागाने एकूण १२ विद्यार्थी आणि १ शिक्षिका अशा १३ जणांना सुरक्षित बाहेर काढले. यापैकी चार ते पाच विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र उपचारादरम्यान मनीष मसे (वय १४) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती वाशी मनपा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *