
मुंबई : दै. मुंबई तरुण भारतचे कार्यकारी संपादक किरण शेलार तसेच रवी राजा यांची मुंबई भाजपाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपकडून मुंबई प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी गुरुवारी ही घोषणा केली.
भाजपच्या या नव्या कार्यकारिणीत किरण शेलार, रवी राजा, अभिजित सामंत, पंकज यादव, अमरजित मिश्रा यांची उपाध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे. तर राजेश शिरवडकर, पवन त्रिपाठी, श्वेता परुळेकर, विनोद शेलार यांची महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी किरीट बन्साळी, युवा मोर्चा अध्यक्षपदी दीपक सिंह यांची वर्णी लागली आहे. तर उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र अनिकेत निकम यांच्या खांद्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. मुंबईच्या प्रवक्तेपदी अनिकेत निकम, निरंजन शेट्टी, अजय सिंह, सुमिता सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपची मुंबई प्रदेश कार्यकारिणी खालीलप्रमाणे
मुंबई प्रदेश उपाध्यक्ष
* किरण शेलार
* रवी राजा
* अभिजित सामंत
* पंकज यादव
* अमरजित मिश्रा
मुंबई प्रदेश महामंत्री
* राजेश शिरवडकर
* पवन त्रिपाठी
* श्वेता परुळेकर
* विनोद शेलार
* मुंबई प्रदेश कोषाध्यक्ष- किरीट बन्साळी
भाजप युवा मोर्चा अध्यक्ष- दीपक सिंह
भाजप मुंबई प्रदेश प्रवक्ते
* अनिकेत निकम
* निरंजन शेट्टी
* अजय सिंह
* सुमिता सिंह
