‘युगपुरुषांच्या पादुकांचा एकत्रित दर्शन सोहळा’
|| संतांची मांदियाळी ॥
चला घेऊ संतांचे आशीर्वाद , वृंदावन सहनिवास पटांगण, जीवा महाले मार्ग, जम्बोदर्शनच्या समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई, येथे रविवार, ८ मार्च, सकाळी १० ते सायंकाळी ६
सकाळी ११.oo वाजता सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या आवाजातील श्री स्वामी समर्थांची ‘मानसपूजा’ उद्घाटन सोहळा आणि यावेळी सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे सादर करणार भक्तिमय गीते युगपुरुषांच्या पादुकांचा एकत्रित दर्शन सोहळा सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे
मुंबई : मेराक इव्हेंट्स यांच्या वतीने भक्तांसाठी एक अद्वितीय आणि अत्यंत आध्यात्मिक असा ‘युगपुरुषांच्या पादुकांचा एकत्रित दर्शन सोहळा’ रविवार, ८ मार्च रोजी वृंदावन सहनिवास पटांगण, जीवा महाले मार्ग, जम्बोदर्शनच्या समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात सकाळी १० ते
सायंकाळी ६ या वेळेत भक्तांना संतांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेता येणार आहे. हा दर्शन सोहळा सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
या पवित्र सोहळ्यात विविध संतांच्या पादुकांचे एकत्रित दर्शन घेण्याची दुर्मीळ संधी भक्तांना मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ क्षेत्र अक्कलकोट, श्री साईबाबा क्षेत्र शिर्डी, श्री साईबाबा क्षेत्र निमोण, श्री गजानन महाराज क्षेत्र जयपूर-कोथळी, श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगड तसेच जंगली महाराज यांच्या पादुकांचे दर्शन भाविकांना एकाच ठिकाणी घेता येणार आहे.
याचबरोबर संतांनी वापरलेल्या काही पवित्र वस्तूंचेही दर्शन भक्तांना होणार आहे. यात स्वामी समर्थ अक्कलकोट यांची गोंड्याची टोपी, साईबाबांनी परिधान केलेले वस्त्र, ढब्बू पैसा, चरण पादुका, चांदीचा टाक, गजानन महाराजांची चिलीम, रामदास स्वामींच्या पूजेतील हनुमानाची पंचधातूची मूर्ती, जंगली महाराजांचा कमंडळू अशा अनेक पवित्र वस्तू भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.
दिवसभर भक्तीमय वातावरणात भक्तीगीते, भजन, तसेच विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या आवाजात श्री स्वामी समर्थांची ‘मानसपूजा’ रेकॉर्ड करण्यात आली असून, तिचे उद्घाटन सकाळी ११.oo वाजता होणार आहे. यावेळी राहुल देशपांडे कार्यक्रमात काही भक्तिगीतेही सादर करणार आहेत, त्यामुळे भक्तांना एक आगळावेगळा आध्यात्मिक आणि संगीतमय अनुभव मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रक हेटे परिवार असून विशेष सहाय्य अथर्व रिअल्टी आणि श्री स्वामी समर्थ मठ, विलेपार्ले (पूर्व) यांचे लाभले आहे.
सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संतांच्या पादुकांचे दर्शन घ्यावे व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दर्शन सोहळ्याच्या लोकेशनसाठी उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करून अधिक माहिती मिळवता येईल.
