आज कुर्ला येथे गोरखनाथ महिला संघाची शालेय मुलींची कबड्डी स्पर्धा
मुंबई : गोरखनाथ महिला संघ, कुर्ला यांच्यातर्फे गौरीशंकर क्रीडा मंडळ, कुर्ला यांच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून १५ वर्षाखालील शालेय मुलींची मोफत कबड्डी स्पर्धा कुर्ला येथील गांधी मैदानावर दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक बंडू कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. या वेळी गोरखनाथ संघाच्या राष्ट्रीय खेळाडू सौ. श्रद्धा आनंद गंभीर, क्रीडा शिक्षिका सोमय्या कॉलेज, पुष्पा डावरे (NIS), सेंट्रल रेल्वे महिला कबड्डी कोच, उषा सावंत साळुंखे, सेंट्रल रेल्वे टीसी, सौ. माधवी कदम (NIS), क्रीडा शिक्षिका हशू अडवाणी मेमोरियल स्कूल, सौ. मेघा म्हात्रे (PSI) यांचा यावेळी खास सन्मान करण्यात येणार आहे, असे संस्थेच्या अध्यक्षा सौ. शलाका कोरगावकर यांनी सांगितले.
महिला मंडळ माध्यमिक विद्यालय कुर्ला, कुमुद विद्यामंदिर इंग्रजी माध्यम गोवंडी, शिवाजी टेक्निकल हायस्कूल घाटकोपर, सेंट जॉन हायस्कूल बोरिवली, एस आय इ एस हायस्कूल, ज्ञान विकास विद्यालय कोपरखैरणे, जवाहर विद्या भवन चेंबूर या शाळांनी स्पर्धेत भाग घेतला आहे.
