जागतिक महिला दिनानिमित्त रायगड जिल्हास्तरीय थर्टी प्लस कररावली थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धा
पनवेल (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनानिमित्त कररावली स्पोर्ट्स अँड एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने रविवार दिनांक ०८ मार्च रोजी खांदा कॉलनी येथे रायगड जिल्हास्तरीय थर्टी प्लस कररावली थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेचे उदघाटन पनवेल महानरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कररावली स्पोर्ट्स अँड एज्युकेशन ट्रस्टच्या चेअरमन महाबला शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आरती मलीक लॅबच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. आरती मलिक, नगरसेविका कविता चौतमोल, कुसुम पाटील, सीता पाटील, अर्थतज्ञ शलाका सोळसे, श्वेता शेट्टी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय जनता पार्टी पनवेल शहर मंडल, श्री खांदेश्वर अय्यप्पा भक्त वृंद, कर्नाटका संघ नवीन पनवेल आणि उडुपि श्रीकृष्णा भजन मंडळ खांदा कॉलनी यांचे सहकार्य लाभणार आहे.
