कल्याणात शिवजयंती निमित्त शिवसेनेच्यावतीने भव्य मिरवणूक

कल्याण : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  तिथी नुसार असलेल्या जयंती निमित्त शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन  झालेल्या ऐतिहासिक कल्याण नगरीत जागोजागी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देवून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवसेना शहर शाखेच्या वतीने चलचित्र रथांसह भव्य  मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी  शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, नगरसेवक गणेश जाधव, जयवंत भोईर, किरण भांगले, प्रतिक पेणकर, माजी नगरसेवक सुनील वायले, अरविंद पोटे, प्रभुनाथ भोईर, नगरसेविका विजया पोटे, शालिनी वायले, डॉ. तनुजा वायले, शिवसेना पदाधिकारी देवानंद भोईर, प्रताप परदेशी आदींसह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आदिवासींचे तारपा नृत्य, झांजांचा निनाद, ढोल ताशांचा गजर, शिवरायांनी रायरेश्वराच्या पिंडीवर हिंदवी स्वराज्याची घेतलेली शपथ, परस्त्री माते समान असे   आकर्षक चित्ररथ आणि लेझीम पथकाच्या दणदणीत सलामीत कल्याणात  शिवजयंती उत्साहात साजरी झाली. सायंकाळच्या सुमारास सरकारी विश्रामगृहापासून मिरवणुकीला सुरुवात झाली.

कल्याण शहरात  चौकाचौकात शिवसेना शाखांतर्फे शिवरायांच्या पराक्रमाचे गोडवे गाणारे देखावे सजवण्यात आले होते. भगव्या कमानी, झेंडे आणि शिवाजी महाराजांची शौर्यगाथा यांचे वर्णन करणाऱ्या पोवाड्यांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. सकाळ पासूनच भगवे फेटे बांधलेले आणि भगवे झेंडे डौलाने मिरवणारे मावळे शिवाजी राजांना वंदन करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *