चंद्रसेन सोनावळे यांच्यावतीने मांडा-टिटवाळा येथे ‘अन्नदान सेवा’ उपक्रम

कल्याण : समाजसेवेचा वारसा जपत आणि वाढदिवसाचे औचित्य साधून श्री सिद्धीविनायक अन्नछत्र मंडळ मांडा – टिटवाळा यांच्या माध्यमातून भव्य ‘अन्नदान सेवा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते चंद्रसेन सोनावळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा स्तुत्य उपक्रम गुरुवारी राबविण्यात आला होता. टिटवाळा येथील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर परिसरात हा कार्यक्रम पार पडला. शेकडो भाविकांनी आणि नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

केवळ हार-तुरे आणि अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजूंच्या पोटाला आधार देण्याच्या या भावनेचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचे नियोजन श्री सिद्धीविनायक अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष विजय  देशेकर, नगरसेवक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सोनवळे यांच्या वतीने अशा सामाजिक उपक्रमांतून नेहमीच जनसेवेचा प्रयत्न केला जातो, असे यावेळी नमूद करण्यात आले. यावेळी चंद्रसेन सोनावळे यांच्यावर हितचिंतक आणि मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *