सुरेखा कडवे स्मृती बुध्दिबळ स्पर्धा

हिरण्मयी, अथर्व, निधीश विजेते

ज्येष्ठ शिक्षिका सुरेखा कडवे स्मृती शालेय बुध्दिबळ स्पर्धेमधील १३ वर्षाखालील गटात हिरण्मयी कुळकर्णी, १० वर्षाखालील गटात अथर्व मुळीक आणि ७ वर्षाखालील गटात निधीश खोपकर यांनी विजेतेपद पटकाविले. परिणामी विजेत्यांबरोबर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांच्या मातांचा देखील आदर्श महिला पुरस्काराने अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते व मंगेश चिंदरकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरव करण्यात आला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप आयोजित स्पर्धेमधील निर्णायक पाचव्या साखळी फेरीत पहिल्या पटावर जी. क्वाड्रसने स्कॉच ओपनिंगचा प्रयोग करीत हिरण्मयी कुळकर्णीच्या राजावर प्रारंभी जोरदार हल्ले केले. परंतु बचाव तंत्राचे अचूक डावपेच रचून अपराजित हिरण्मयीने २८ व्या मिनिटाला बाजी मारली.

आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, आरएमएमएस व मुंबई बुध्दिबळ संघटना सहकार्याने झालेल्या स्पर्धेच्या १३ वर्षाखालील गटात मुलींमध्ये हिरण्मयी कुळकर्णीने (४.५ गुण) प्रथम, जी. क्वाड्रसने (३ गुण) द्वितीय, साईशा मुळेने (२.५ गुण) तृतीय आणि मुलांमध्ये गोकर्ण औटीने (४ गुण) प्रथम, प्रणव जैनने (३.५ गुण) द्वितीय, अर्णव जगतापने (३ गुण) तृतीय; १० वर्षाखालील गटात मुलींमध्ये आध्या पाठकने (४ गुण) प्रथम, साध्या जाधवने (३ गुण) द्वितीय, विधी येसणेने (३ गुण) तृतीय आणि मुलांमध्ये अथर्व मुळीकने (५ गुण) प्रथम, कैवल्य परबने (४ गुण) द्वितीय, अर्णव शेटेने (३ गुण) तृतीय तर ७ वर्षाखालील गटात मुलींमध्ये मिर्या तिवारीने (४ गुण) प्रथम, मनस्वी पाटीलने (४ गुण) द्वितीय, पेहेर शाहने (३ गुण) तृतीय आणि मुलांमध्ये निधीश खोपकरने (५ गुण) प्रथम, आरुष नेवस्करने (२.५ गुण) द्वितीय, सार्थ शाहने (२.५ गुण) तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जिंकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *