एस ४ लीजेंड्स कप २०२६
एनबीईई स्पोर्ट्स क्लबने पटकवलं विजेतेपद
ठाणे – ऍडव्होकेट रमाकांत ओवळेकर यांच्या स्मरणार्थ ४५ वर्षांवरील खेळाडूंसाठी क्रिकेटची स्पर्धा ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथे सुर सुदान शौर्या स्वर संस्थेतर्फे आयोजित करण्यात आली होती. एस ४ लीजेंड्स कप २०२६ एनबीईई स्पोर्ट्स क्लबने पटकावला. स्पर्धेत ठाणे थंडर्स, एनबीईई स्पोर्ट्स क्लब, ठाणे रोटरी टायटन्स, पीडब्लूडी, आम्ही मुलुंडकर, गरवारे क्लब, मिड सिटी सीसी डोंबिवली आणि रारा मास्टर्स असे एकूण आठ संघानी सहभाग घेतला. आयपीएल, रणजी, प्रथम श्रेणीतील खेळाडूंचा संघात समावेश होता. प्रवीण तांबे, संदीप दहाड, अमित दाणी, रॉबिन मॉरिस, अमित पागनीस, अमित वेलस्कर, मनोज जोगळेकर, आशिष महाडेश्वर, श्रेयस खानोलकर, विनोद राघवन व इतर दिग्गज खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला.
एनबीईई स्पोर्ट्स क्लबने विजेते पदाचा खिताब पटकाविला. तर ठाणे थंडर्स उपविजेता ठरला. तर दुसरा उपविजेता संघ गरवारे क्लब ठरला. सामनावीर म्हणून ओजस मेहता, उत्कृष्ट फलंदाज देवा मोरे, उत्कृष्ट गोलंदाज योगेश डिचोलकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ओजस मेहता, उत्कृष्ट यष्टीरक्षक सागर जोशी यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विजेतेपदाची ट्रॉफी उषा मधुकर चांदुरकर यांनी मधुकर रामचंद्र चंद्रुकर यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली. उद्योजक व शैक्षणिक क्षेत्रातून महान व्यक्ती अश्विन वसवडा, केंद्रीय मंत्रालय उपसचिव श्री किमबहुने, आदेश चांदुरकर, किरण राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समता ओवळेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. महिला दिनाचे औचित्य साधून समाजसेविका प्रतिभा चांदूरकर, लीना जाधव, सविता साळुंखे, शुभांगी भोर, शैला सिंह यांचा सत्कार करण्यात आला. सामनाचे आयोजन व सूत्रसंचालन संस्थेच्या सचिव नम्रता ओवळेकर राणे यांनी केले.
