मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा लोकसभेसाठीचा वचननामा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. उद्योगाला आम्ही चांगले दिवस आणू. पर्यावरण पूरक प्रकल्प आणू, जीएसटीवरील त्रासदायक अटी आम्ही काढून टाकू अशी वचने या वचननाम्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली.

 बारसू, नाणार सारखे पर्यावरणाला हानी पोहचवणारे प्रकल्प हद्द पार करू,  आम्ही लोकप्रतिनिधींना त्यांचे अधिकार देऊ. कर, दहशतवाद हा मुद्दाही महत्वाचा आहे, तो आम्ही थांबवू. ज्या धाडी आणि इतर गोष्टी सुरू आहेत, त्या थांबवू, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

केंद्राने पेट्रोल दरातून पैसे कमावले तसे राज्याने कमावले नाही. शेतकऱ्यांची जीएसटीच्या माध्यमातून होणारी पिळवणूक होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मोदी सरकार हे महाविकास आघाडीला त्यावेळी काहीही मदत करत नव्हतं. आघाडीचं सरकार आल्यानंतर जो काही खड्डा पाडलेला आहे, तो आम्ही भरून काढू. आम्ही गुजरातचं काही ओरबाडून घेणार नाही. प्रत्येक राज्याचा आदर ठेवून त्यांना जे हवं ते देऊच, मात्र महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध करू, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करू, प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा आणू, अनेक जिल्ह्यात औषधाविना रुग्णांचे मृत्यू झाले ते होणार नाही, अशी यंत्रणा उभारू, अशी उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *