पुणे : उद्धव ठाकरेंच्या संजोग वाघेरेंना राजकीय शह देण्यासाठी नाशिकच्या संजय वाघेरे नावाच्या व्यक्तीने मावळमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अपक्ष अर्ज भरलेले संजय वाघेरेंचे मूळ गाव नाशिक असताना त्यांनी मावळ लोकसभेतून निवडणूक लढण्याचा निर्णय का घेतला असेल? शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या संजोग वाघेरेंच्या मतांची विभागणी करण्यासाठी ही खेळी करण्यात आली आहे का? तसं असेल तर यामागे नेमका कोणाचा हात असेल? अशी चर्चा मावळ लोकसभेत रंगलेली आहे.
नाशिकच्या संजय वाघेरे यांनी जरी अर्ज भरला असला तरी अद्याप अर्ज छाननी अन् अर्ज मागे घेण्याची मुदत संपायची आहे. हे दोन टप्पे पार केल्यावरचं नाशिकच्या संजय वाघेरेंची मावळमधून उमेदवारी अंतिम मानली जाईल.