बेघर लाडक्या बहिणींचा आझाद मैदानात मोर्चा
रमेश औताडे
मुंबई : गरिबांची झोपडी तोडायची अन् त्या ठिकाणी गगनचुंबी इमारत उभी करायची. असा डाव आखलेल्या बिल्डर साठी सरकार पण सहकार्य करत आहे. मात्र सरकारने या झोपडीत राहणाऱ्या लाडक्या गरीब बहिणीचा विचार करत तिला पण निवारा द्यावा. गगनचुंबी इमारती आम्ही घर मागत नाही. आमच्या परिस्थिती प्रमाणे आर्थिक गणिक जुळवत निवारा द्यावा. अशी मागणी आझाद मैदानात युवा भिम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास अर्जुन माने यांनी जयभीमनगर पवई व संभाजी नगर येथील पंतप्रधान गृह निर्माण विकास ठिकाणी असणाऱ्या पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या बेघर झालेल्या कुटुंबातील महिलांना घेऊन आझाद मैदानात मोर्चा काढला आहे. स्थानिक पोलिस नगरसेवक आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी हिरानंदानी बिल्डर साठी आम्हाला बेघर केले आहे. त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
