खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान
अशोक गायकवाड
रायगड- नागोठणे : पनवेल येथील गेली अनेक वर्षे पत्रकारितेमध्ये लेखणीच्या माध्यमातून वंचित घटकांना न्याय देण्याबरोबरच विविध सामाजिक विषय मार्गी लावणारे पनवेल महानगर प्रेस क्लब चे अध्यक्ष पत्रकार प्रशांत शेडगे यांना नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोशियनचा मानाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोशियनचा १४ वा वर्धापन दिन मोठया उत्सवात साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार लोकनेते सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याच बरोबर नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोशियनचे अध्यक्ष अँड.महेश पवार, संस्थापक श्यामकांत नेरपगार, सचिव अनिल पवार व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.पत्रकार प्रशांत शेडगे गेली २० वर्षे पत्रकारितेत सक्रिय असून त्यांनी आता पर्यंत अनेक नामांकित वृतपत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.यामुळे पत्रकार शेडगे यांना पनवेल गौरव पुरस्कार,पनवेल भूषण पुरस्कार,महाराष्ट्र एक्सेलन्स अवार्ड बरोबरच अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यात आणखीन उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याने समाजातील सर्व स्थरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
000000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *