ठाणे:- ठाणे,भारत निवडणूक आयोगाने ठाणे जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघासाठी खर्चविषयक बाबींसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
२३ भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून चित्तरंजन धनगडा माझी (आयआरएस), २४ कल्याण मतदारसंघासाठी नकुल अग्रवाल (आयआरएस) आणि २५ ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमती चंद्रा प्रकाश मीना (आयआरएस) व राहिल गुप्ता (आयआरएस) यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक विभागाने कळविली आहे.
