‘१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय परिषद संपन्न
अनिल ठाणेकर
सांगली, स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्था संचलित, बाबा नाईक महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभाग आणि आय.क्यू.ए.सी. (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने “१९४७ चा भारत आणि आजची कृषी शाश्वतता” या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अॅड. भगतसिंग नाईक यांच्या हस्ते झाले. बीजभाषक म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रो. डॉ. एम. एस. देशमुख यांनी भारताच्या ७९ वर्षांच्या कृषी प्रवासाचा आढावा घेतला. परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला पाटील होत्या. या सत्राचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रो. डॉ. विनोद राठोड यांनी केले. प्रथम सत्र: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय ठिगळे यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कृषी विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या सत्राचे अध्यक्षपद डॉ. जयवंत इंगळे यांनी भूषवले. या सत्राचे आभार प्रो.डॉ.के.आर.गावडे यांनी मानले.द्वितीय सत्र: पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथील डॉ. कुलविंदर सिंग यांनी १९४७ मधील कृषी स्थिती आणि आजची शाश्वतता यातील आव्हानांवर सविस्तर प्रकाश टाकला. या सत्राचे अध्यक्ष डॉ. मनोहर कोरे होते.या परिषदेसाठी तांत्रिक सहाय्य आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रो. डॉ. अनिल काटे आणि प्रा.डॉ. संदीप देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. एस. डी. शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. निलेश कांबळे यांनी मानले. या ऑनलाईन परिषदेत देशातील विविध भागांतून प्राध्यापक आणि संशोधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
