मुरली सुब्रमण्यम एकेरीत राष्ट्रीय बॅडमिंटन विजेता
मडगाव (गोवा) : येथे सुरू असलेल्या Yonex Sunrise ४८व्या भारतीय मास्टर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा २०२५-२६ मध्ये मुंबईच्या मुरली सुब्रमण्यम यांनी ६० वर्षांवरील एकेरी गटात दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय विजेतेपद मिळविले.
मुरली यांनी उपांत्यपूर्व फेरीत माजी राष्ट्रीय विजेते राम लखन यादव यांचा २१-१८, २१-१४ असा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत पावालावानन बी यांना २१-१३, २१-८ ने नमवित अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात रामझोवा के यांच्यावर २१-९, २१-१७ अशी सरशी करत त्यांनी विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
