सोयगांव : शेतकऱ्यांची हक्काची बॅक म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके ची ओळख असून हीच बॅक आता शेतकरीवर्ग ला शाप ठरत आहे.सोयगांव शहरातील बॅके च्या शाखेत आपले हक्काचे पैसे पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरीवर्ग ला चार ते पाच दिवसाचा कालावधी लागत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गा ला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

राज्य सरकार ने सोयगांव तालुका दुष्काळग्रस्त घोषित केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने एक कोटी ७३ लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळग्रस्त अनुदान जमा केले तसेच श्रावण बाळ योजनेंतर्गत असलेल्या निराधारांच्या बॅक खात्यात एक कोटी ८० लाख रुपये अनुदान वाटप करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँके च्या सोयगांव शाखेत गेल्या पंधरा दिवसांपासून शासनाने जमा केले आहेत. परंतु बॅकेत पैशांचा ठणठणाट असल्यामुळे पंच्याहत्तर टक्के शेतकरी , निराधार लाभार्थी ना दिवसभर बॅकेत पैशे काढण्या साठी नंबर लावून घरी रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. त्या मुळे शेतकरी , निराधाराना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

बॅके च्या वतीने शेतकरी , निराधारांसाठी व्यवस्था नाही — सोयगांव शहराचे तापमान सध्या  , ४२ डिग्री सेल्सिअस तापमान आहे.  दुष्काळग्रस्त शेतकरीवर्ग व निराधार जेष्ठ नागरिक शासनाकडून आलेले अनुदान काढण्या साठी सकाळ पासूनच सोयगांव जिल्हा बॅक शाखेत नंबर लावून दिवसभर बसत आहे. बॅके च्या वतीने कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे उच्च तापमानात शाखे च्या बाहेर बसावे लागत आहे. त्यामुळे चक्कर येऊन पडणे अशा घटना घडत आहे. व त्यातच चार ते पाच दिवस बॅकेत पैसे मिळत नसल्यामुळे शेतकरी व निराधार जेष्ठ नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.एकंदरीतच शेतकऱ्यांची बॅक म्हणून ओळख असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक आता शेतकरीवर्गाला शाप ठरत आहे.

मुख्यालया कडूनच पैशांचा पुरवठा कमी

सोयगांव  शाखे साठी आम्ही दररोज संभाजीनगर मुख्यालया कडे एक कोटी रुपयांची मागणी करतो. जेणेकरून शेतकरीवर्ग व निराधार जेष्ठ नागरिकांना वेळेवर अनुदान वाटप होईल. परंतु मुख्यालया कडून कमी प्रमाणात कॅश उपलब्ध होत असल्यामुळेच बॅकेत व ए.टी.एम मशीन वर पैशांची टंचाई जाणवत आहे. असे जिल्हा बॅक सोयगांव शाखेचे व्यवस्थापक  अनिल पाटील सोयगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *