ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धा
ठाणे : पियुष कनोजियाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अरुप्रीत टायगर्स एलएलपी संघाने गोदरेज स्टाफ क्लबचा सात गडी राखून दणदणीत पराभव करत सुवर्णमहोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेतील ब गटातील विजयी आगेकूच कायम राखली. विजयाचा शिल्पकार ठरलेल्या पियुष कनोजियाने पाच षटकांत अवघ्या दोन धावांत सहा बळी मिळवून छाप पाडली. गोदरेजच्या १३१ धावांचे आव्हान अरुप्रीत टायगर्स एलएलपी संघाने १४ षटकात १३७ धावा करत पार केले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या गोदरेज स्टाफ संघाच्या आघाडीचे फलंदाज धावा करण्यात सपशेल अपयशी ठरले असताना पूर्वार्य गुंडुर आणि प्रशांत खावरेने दहाव्या गड्यासाठी १०४ धावांची भागीदारी संघाच्या धावसंख्येला आकार दिला. पूर्वार्याने नाबाद ६० आणि प्रशांतने ४o धावा बनवल्या. या डावात पीयुषसह ओमकार करंदीकरने तीन फलंदाज बाद केले. छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना आकाश जांगिडने ६० धावांची खेळी केली.अश्विन माळीने नाबाद २३ आणि शंतनु नायकने नाबाद २७ धावा बनवल्या.
संक्षिप्त धावफलक : गोदरेज स्टाफ क्लब : ३३.४ षटकात सर्वबाद १३१( पूर्वार्य गुंडुर नाबाद ६०, प्रशांत खावरे ४०, पियुष कनोजिया ७-५-२-६, ओमकार करंदीकर ७-३९-३) पराभूत विरुद्ध अरुप्रीत टायगर्स एलएलपी : १४ षटकात ३ बाद १३७ ( आकाश जांगिड ६०, अश्विन माळी नाबाद २३, शंतनु नायक नाबाद २७).
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *