छोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे – रामदास आठवले

मुंबई / रमेश औताडे

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानून काम करणाऱ्या छोट्या राजकीय पक्षांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये झाले पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षात विलीन करून मिलिंद सुर्वे यांचा शेकडो कार्यकत्यांसह रिपब्लिकन पक्षात प्रवेश तसेच राष्ट्रवादीचे नेते जीवन जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन जाधव आणि डॉ रश्मी जीवन जाधव यांच्या नेतृत्वात त्यांच्या अनेक सहकान्यांनी जाहीर प्रवेश केला.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील प् आहोत. संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष आपण पोहचवला असून लवकरच रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे. त्या दृष्टीने रिपब्लिकन  पक्षाची घोडदौड सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी छोट्या रिपब्लिकन गटांनी, पक्षांनी आणि संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे असे आवाहन आठवले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *