मनोज रामचंद्र स्मृती महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा
अव्वल मानांकित पूर्वा, आर्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
मुंबई : अव्वल मानांकित पूर्वा बर्वे आणि दुसऱ्या मानांकित आर्या कोरगावकरने माटुंगा जिमखाना कोर्टवर खेळल्या जात असलेल्या योनेक्स सनराईज मनोज रामचंद्र स्मृती महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने नॉर्थ इंडियन असोसिएशन आणि जितेश पादूकोण अकादमीद्वारे आयोजित बॅडमिंटन स्पर्धेला एसव्हीसी सहकारी बँक आणि सारस्वत सहकारी बँकेचे सहकार्य लाभले आहे.
राऊंड ऑफ ३२ फेरीत पूर्वाने आक्रमक शैली आणि उत्तम डावपेचांच्या जोरावर अनन्या राणेवर १५-०, १५-८ असा विजय मिळवला. आर्याला टियान कॅस्टेलिनोकडून थोडा प्रतिकाराचा सामना करावा लागला. पण तिने १५-५, १५-८ असा विजय मिळवून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
दरम्यान, शिवंजली कार्डिलेने टिया उग्रानकरविरुद्ध पहिला गेम गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत १७-१९, १५-६, १५-१३ अशी बाजी मारताना अव्वल दोन मानांकित खेळाडूंसोबत पुढील फेरीत प्रवेश केला. तिसरी मानांकित श्रेया भोसले आणि चौथी मानांकित श्रेया शेलार यांनीही राऊंड ऑफ १६ फेरीत स्थान मिळवले. ज्युनियर गटांमध्ये, १५ वर्षांखालील मुलांच्या गटात श्लोक अंबरकर आणि आदेश एकाडेने राऊंड ऑफ ३२ फेरीतील आपापले सामने जिंकले. श्लोकने पुनरागमन करत आराध्य पवारला १२-१५, २०-१८, १५-९ असे हरवले तर आदेशने आदित्य सरवदेवर ११-१५, १५-७, १५-१० अशी मात केली.
निकाल – महिला एकेरी (राऊंड ऑफ ३२ फेरी): १- पूर्वा बर्वे विजयी वि. अनन्या राणे १५-०, १५-८;
२-आर्या कोरगावकर विजयी वि. टियान कॅस्टेलिनो १५-५, १५-८;
शिवांजली कर्डिले विजयी वि. टिया उग्रंकर १७-१९, १५-६, १५-१३;
३-श्रेया भोसले विजयी वि. रुची राणे १५-५, १५-१;
४-श्रेया शेलार विजयी वि. ऋषिका पाल १५-४, १५-४.
१५ वर्षांखालील मुली (राऊंड ऑफ ३२ फेरी): १-अन्विषा घोरपडे विजयी वि. पहल तन्ना १५-३, १५-४;
मनस्वी राऊत विजयी वि. मीरा दीक्षित १५-८, १५-१३;
अनुश्री मोडलिंबकर १५-५, १५-७;
आराध्या शुक्ला विजयी मेहा शाह १५-७, १५-५;
