६२ कोटींच्या ग्रीन कर्जरोख्यानंतर घनकचरा फाईव्ह स्टार होणार का? – शानू पठाण

अनिल ठाणेकर

ठाणे- ठामपा आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात घनकचरा विभागाला एका एजन्सीने थ्री स्टार दिले आहेत. या स्टार्सची विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी खिल्ली उडविली. शर्टवर स्टार चिकटवून तसेच बॅगला स्टार लटकवून सर्वसाधारण सभेत प्रवेश केला.

ठाणे महानगर पालिकेचे अंदाजपत्रक आयुक्त सौरव राव यांनी सादर केले असून या अंदाजपत्रकावर सध्या सभागृहात चर्चा झाली. या अंदाजपत्रकात घनकचरा विभागाचे कौतूक करून एका एजन्सीने थ्री स्टार मानांकन दिले आहे. या मानांकनाची शानू पठाण यांनी खिल्ली उडविली. छातीवर तीन तारे आणि बॅगला तीन तारे लावून शानू पठाण हे सभागृहात प्रवेशकर्ते झाले. याप्रसंगी पत्रकारांशी  बोलताना शानू पठाण यांनी, घनकचरा विभागाचे कौतूक व्हावे, हा एक विनोदच आहे. कारण, ठाणे शहरात कदाचित कचरा दिसत नसेल पण मुंब्रा, कौसा आणि दिवा भागात कचरा वहनाची व्यवस्थाच नसल्याने कचऱ्याचे ढिग लागलेले दिसत असतात. हे स्टार देताना एजन्सीने कोणत्या दुर्बिणीतून पाहिले असेल ती दुर्बिण आम्हालाही द्या, अशी टीका केली. दरम्यान, ६२ कोटींच्या ग्रीन कर्जरोख्यानंतर घनकचरा फाईव्ह स्टार होणार का, असा सवालही उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *