चिमुकल्यांचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न
हरिभाऊ लाखे
नाशिक :स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय पूर्व प्राथमिक, इंदिरानगर येथे ९ एप्रिल रोजी मोठ्या गटातील विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ आनंदात पार पडला. वसंताच्या आगमनासोबत नवचैतन्याने भरलेला हा सोहळा विशेष ठरला.
प्रमुख अतिथी म्हणून शिल्पा सुशांत पटवा (लिटल मिलेनियम प्री-स्कूल, द्वारका) उपस्थित होत्या. दीपप्रज्वलन, ईशस्तवन व प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक रत्नाकर वेळीस यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
विद्यार्थ्यांना कॅप व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध स्पर्धांतील बक्षिसांचे वितरणही करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक करताना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी पसायदानाने सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन पारखे मॅडम यांनी केले, तर वनिस मॅडम यांनी आभार मानले.

