मुंबई : येत्या ६ ते २० मे दरम्यान ठाणे (पूर्व) येथील धि युनायटेड स्पोर्ट्स क्लबमध्ये सर्व वयोगटातील मुला-मुलींसाठी पॉवरलिफ्टिंग खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. छत्रपती पुरस्कार प्राप्त नामवंत पॉवरलिफ्टिंग खेळाडू अनंत चाळके यांच्यातर्फे या खेळाचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त युवा खेळाडूंनी या खेळाकडे आकर्षित व्हावे हा या प्रशिक्षण वर्गाचा मूळ हेतू आहे. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक ९३२४५०६०६६ अथवा ९७०२१७१००४ यावर संपर्क साधावा.