– जेष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुकुंद रांजाणे (माथेरान)जेष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात एसटी महामंडळ बसेसची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी माथेरान मध्ये एम.एस.आर.टी.सी.( कर्जत ) आणि माथेरान जेष्ठ नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन श्रीराम चौकातील गेम झोन याठिकाणी करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिकांनी या शिबिरास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
माथेरान शहरातील १८ वर्षावरील सर्व महिला,६५ वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिक, ७५ वर्षावरील सर्व जेष्ठ नागरीक या सर्वांकरिता महाराष्ट्र राज्यात सवलतीच्या दरात एसटी बसने प्रवास करताना स्मार्ट कार्डाचा वापर करता येणार आहे.हे कार्ड बनविण्यासाठी जेष्ठ नागरिकांना कर्जत आगारात जाणे शक्य नसल्याने कर्जत आगार प्रमुख महादेव पालवे यांच्या सहकार्याने आणि माथेरान जेष्ठ नागरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन दि.१९ रोजी अक्षयतृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सकाळी १० ते सायंकाळी चार वाजेपर्यंत करण्यात आले. जवळपास नव्वद जेष्ठ नागरिकांनी या शिबिरात आपला सहभाग नोंदवला.या शिबिराला विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी भेट देऊन जेष्ठ नागरिकांशी संवाद साधताना नगर परिषदेच्या माध्यमातून जे काही सहकार्य आवश्यक आहे ते निश्चितच केले जाईल असे सांगितले.यावेळी नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी कर्जतचे अक्षय म्हसे, गीता शहा यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. हा महत्वपूर्ण शिबिराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अब्दुल रहिमान शेख,उपाध्यक्ष अरविंद रांजाणे, सचिव अनंत शेलार, खजिनदार रजनी (बीना) कदम, सल्लागार चंद्रकांत जाधव, प्रकाश (अण्णा) सुतार,दत्ता सनगरे, वासंती जांभळे, कांचन केतकर, जयश्री रामाणे, सुहासिनी शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
00000000
