नामवंत पत्रकार अशोक वानखेडे, दिवाकर शेजवळ, संविधानतज्ज्ञ ॲड. जयमंगल धनराज मार्गदर्शक
नांदेड (२० एप्रिल २०२६) – नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरवादी लोक मंचातर्फे भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव नांदेड शहरात येत्या रविवारी २६ एप्रिल २०२६ रोजी दणक्यात साजरा करण्यात येणार आहे.  त्यात संध्याकाळी ४ वाजता शंकरराव चव्हाण सभागृहात ‘ धर्मनिरपेक्ष भारताचे भवितव्य ‘ या विषयावर मराठवाड्यातील ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते सुरेशदादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली  प्रबोधन महासभा ‘ आयोजित करण्यात आली आहे. खासदार रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रतापराव चिखलीकर हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या महासभेत राजधानी दिल्लीतील नामवंत पत्रकार अशोक वानखेडे, मुंबईतील डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य, बहुजन समाज पार्टीचे मुंबई – कोकण क्षेत्राचे प्रभारी ॲड. जयमंगल धनराज, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ हे प्रमुख मार्गदर्शक आहेत, अशी माहिती आंबेडकरवादी लोक मंचाचे महासचिव देविदास मनोहरे आणि पी. एस गवळे यांनी  एका पत्रकाद्वारे दिली आहे.
यंदाचे वर्ष हे महाडच्या चौदार तळ्यावरील समता संगराच्या शताब्दीचे आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जन्म द्विशताब्दीही राज्यात सुरू झाली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवात यावर्षी दलित – बहुजन समाजात मोठा जोश आणि चैतन्य संचारले आहे, असे आंबेडकरवादी लोक मंचाचे  संस्थापक – अध्यक्ष सुरेशदादा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *