आता चौकशी करणार फ्लेमिंगोच्या मृत्यूची

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना नवी मुंबईतील १० फ्लेमिंगोच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

नवी मुंबईतील खाडीत एका आठवड्यात १० फ्लेमिंगोचा मृत्यू झाला होता.  याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पर्यावरण संस्था नॅटकनेक्ट फाऊंडेशनने केली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंढे यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राहिलेले तुकाराम मुंढे हे सध्या महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाचे सचिव आहेत. कडक आणि प्रामाणिक IAS अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची प्रतिमा आहे. त्यांच्या 18 वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत 20 वेळा बदली करण्यात आली आहे, अशा प्रामाणिक अधिकाऱ्याकडे चौकशी दिली याचा आम्हाला आनंद आहे, आम्हाला आनंद आहे, असे नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार यांनी सांगितले.

नवी मुंबईतील डीपीएस तलावाभोवती 10 फ्लेमिंगो मरण पावले  व  पाच फ्लेमिंगो जखमी झाले आहेत. फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी नवी मुंबईतील हा एक महत्त्वाचा सरोवर पाणथळ प्रदेश म्हणून ओळखला जातो. नवी मुंबई महापालिकेने स्वतः पाणथळ जागा फ्लेमिंगोचे निवासस्थान आणि पर्यटकांचे आकर्षण म्हणून संरक्षित करण्याची आवश्यकता होती. त्यासाठी पर्यावरण संस्था नॅटकनेक्ट फाऊंडेशन सहकार्य करणार होते. मात्र सिडकोने आतापर्यंत हे काम महापालिकेकडे देण्यास नकार दिला आहे. सिडकोने सुमारे 25 तलाव नागरी संस्थेकडे हस्तांतरित केले आहेत परंतु डीपीएस फ्लेमिंगो तलाव, एनआरआय आणि टीएस चाणक्य पाणथळ जागा राखून ठेवल्या आहेत.या जागा राखीव ठेवल्या आहेत. असे नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *