– क्रीडाक्षेत्रातील पितापुत्रांना मामासाहेब मोहोळ शैक्षणिक संस्‍थेची अनोखी मानवंदना

पुणेः   स्वातंत्र्यसेनानी  व कुस्‍तीमहर्षी स्व. मामासाहेब मोहोळ व त्यांचे पुत्र कसोटीपटू स्व. सदानंद मोहोळ यांच्या अध्याकृती पुतळ्याचे अनावरण शनिवार २५ एप्रिलला पुण्याजवळील मुळशीत होणार आहे. क्रीडामहर्षी पितापुत्रांना मामासाहेब मोहोळ शैक्षणिक संस्‍थेकडून अनोखी मानवंदना एकत्रितपणे दिले जाणार आहे.

नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान पुणे व मामासाहेब मोहोळ विद्या विकास मंडळ संस्‍थेने या समारंभाचे आयोजन केले आहे. हा समारंभ २५ एप्रिलला सकाळी ११ वाजता मुळशीतील पिरंगुट येथील मामासाहेब मोहोळ संस्थेच्या आयटीआय सभागृहात  होणार आहे.

स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या पुतळ्याचे अनावरण जेष्ठ विचारवंत माजी आमदार उल्हास दादा पवार यांच्या तर स्व.सदानंद मोहोळ यांच्या पुतळ्याचे व सभागृहाचे अनावरण कसोटीपटू व भारतीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष चंदू बोर्डे यांच्या शुभहस्ते होणार आहे. माजी खासदार अशोक मोहोळ, नानासाहेब नवले, बाळासाहेब गांजवे, दिलीप बराटे, संग्राम मोहोळ, कुणाल मोहोळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मामासाहेब व सदानंद मोहोळ यांचे कार्याचा आदर्श नवीन पिढीपुढे राहावा या उद्देशाने संस्थेने मामासाहेब मोहोळ यांचा पुतळा पिरंगुट येथील विद्यालयात बसविण्यात आला असल्याची माहिती नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक मोहोळ यांनी दिली आहे.

चौकट

सदानंद मोहोळांच्‍या स्‍मृती जागणार

सदानंद नामदेव मोहोळ हे भारताचे  मध्यम-वेगवान गोलंदाज होते. ते १९६० ते १९७१ पर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या मोहोळ यांनी १९६७ मध्ये भारतीय संघासोबत इंग्लंडचा दौरा केला होता. मोहोळ रिव्हर्स स्विंग मध्ये कुशल होते. त्‍यांच्‍या पुतळ्याचे अनावरण चंदू बोर्डे यांच्‍या हस्‍ते होणार असल्‍याने त्‍यांच्‍या क्रिकेट कारकिर्दीला शनिवारी उजाळा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *