आमदार संजय केळकर यांचे प्रतिपादन

अनिल ठाणेकर

ठाणे, महाराष्ट्र शासनाच्या सिव्हिल डिफेन्स कार्यालयर्फे आयोजित बेसिक प्रशिक्षण कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आपत्कालीन अधिकारी वर्गाला मुख्य क्षेत्रस्थ नागरिक संरक्षण ठाणे तथा आपत्कालीन कार्यवाही केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम ठाणे पश्चिम येथील तीन हात नाका, एलबीएस मार्गावरील वाहतूक नियंत्रण शाखेच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

५ जून २०२४ ते ९ जून २०२४ या कालावधीत कल्याण येथील ब्राइट स्कूलमध्ये हा प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्यात आला होता. प्रशिक्षणादरम्यान आपत्ती व्यवस्थापन, नागरिक संरक्षण तसेच आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘सेकंड मार्शल’ श्रेणीतील प्रमाणपत्र देण्यात आले. हे प्रमाणपत्र ठाणे सिव्हिल डिफेन्स विभागामार्फत देण्यात आले असून उपनियंत्रक नागरिक संरक्षण ठाणे विजय बी. तावरे तसेच जिल्हाधिकारी तथा सिव्हिल डिफेन्स नियंत्रक अशोक शिनगारे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला उपनियंत्रक नागरिक संरक्षण ठाणे विजय बी. तावरे, सहायक उपनियंत्रक नागरी संरक्षण अनिल गावित, उपायुक्त क्षेत्रीय नागरी संरक्षण ठाणे कमलेश श्रीवास्तव, उपसंचालक क्षेत्रीय नागरी संरक्षण ठाणे हरिभाऊ शिंग पुरे, विभागीय क्षेत्रीय नागरी संरक्षण ठाणे डॉ. श्रीकांत पाटील, तसेच विविध विभागांतील समन्वयक आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनोजकुमार पाटील यांनी केले. स्वागत व परिचय अनिल गावित यांनी करून दिला. आभार प्रदर्शनही अनिल गावित यांनीच केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सोनवणे यांनी केले. यावेळी आमदार संजय केळकर यांनी सांगितले की, सिव्हिल डिफेन्सचे प्रशिक्षण हे केवळ प्रमाणपत्रापुरते मर्यादित नसून समाजसेवेची मोठी जबाबदारी आहे. प्रशिक्षित स्वयंसेवक आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी मिळवलेले ज्ञान प्रत्यक्ष कार्यात उतरवणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. ठाणे शहरासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात आपत्ती व्यवस्थापनाची सज्जता अत्यावश्यक असून सर्वांनी समाजाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *