कल्याण: जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्याने अक्षरमंच प्रकाशनचे वतीने डॉ योगेश जोशी लिखित वंद्य वंदे मातरम् या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन प्रा. गजेंद्र दीक्षित, प्रा. शैलेश रेगे आणि लेखक हेमंत नेहते यांच्या हस्ते करण्यात आले.

७ नोव्हेंबर २०२५ रोजी वंदे मातरम ला १५० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्याने युवा पिढीला ‘वंदे मातरम् ‘ चा इतिहास कळावा या हेतूने पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले होते. आजपर्यंत या पुस्तकाच्या नऊ हजार प्रती कल्याण डोंबिवलीसह पुणे, नाशिक, रत्नागिरी, गोवा येथील शाळांमध्ये विनामूल्य वितरीत करण्यात आल्या आहेत. या उपक्रमाचे संकल्पनाकार डॉ योगेश जोशी यांनी या पुस्तकाच्या वर्षभरात म्हणजेच ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत २५ हजार प्रती विनामूल्य वाटण्याचा संकल्प असल्याचे जाहीर केले.

या पुस्तकामध्ये ‘वंदे मातरमचे रचयिताकार बंकिमचंद्र चटर्जी यांचे चरित्र, त्यांना वंदे मातरम कसे सुचले, आनंदमठ कादंबरीचे कथासूत्र, वंदे मातरम् मुळे घडलेली क्रांती, संपूर्ण वंदे मातरम् आणि त्याचा अर्थ अशा अनेक गोष्टी मुलांना समजतील अशा भाषेत मांडल्या आहेत. ‘वंद्य वंदे मातरम्’ या पुस्तकाच्या प्रती अक्षरमंच प्रकाशनच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. ज्या शैक्षणिक संस्था , ग्रंथालये, क्लासेस यांना या प्रती हव्या असतील त्यांच्या प्रतिनिधींनी ९७५७०७७६१४ / ८७७९६४४९९२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

0000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *