कल्याण: नडगाव गावाचे सुपुत्र तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जेष्ठ बौद्धाचार्य रघुनाथ भोईर यांच्या दिशा दर्शक या कविता संग्रहाचे पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बौद्धाचार्य उघडे गुरुजी व बौद्धाचार्य रामचंद्र पवार यांनी बौद्ध संस्कार विधीचा कार्यक्रम पार पाडला. त्यानंतर महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी विचार मंचावर जेष्ठ साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड, कवी जयवंत सोनवणे, बीए जाधव, दिशादर्शक कविता संग्रहाचे लेखक रघुनाथ भोईर, जेष्ठ पॅथर नेते प्रा एकनाथ जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत भोईर, रिपाइंचे ठाणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भालेराव, रिपाइंचे जिल्हा सचिव प्रमोद जाधव, नगरसेवक बंदेश जाधव, रिपाइंचे मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर, अभिमन्यू भालेराव, प्राध्यापक डॉ संदीप भालेराव, भारतीय बौद्ध महासभेच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष शीला तायडे, भाजप तालुका अध्यक्ष शेखर लोणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय भोईर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. प्रास्ताविक भाषण सुर्यकांत भोईर यांनी केले तर सुत्रसंचलन तुषार वैध यांनी केले. दिशा दर्शक या कविता संग्रहात तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर,माता रमाबाई तसेच मानवी जीवन संबंधित कविता अगदी सुंदर प्रकारे आहेत. सामाजिक चळवळ कवितेतून दिसून येत आहे. कार्यक्रम यशस्वितेसाठी एकता मित्र मंडळ नडगाव, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मांडा टिटवाळा, सिध्दार्थ बुद्ध विहार समिती व उत्थान समिती या सर्वांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पत्रकार विलास भोईर यांनी केले.
